स्वयंसेवकांना हवे तोवर मी पदावर राहणार, मोदींना सांगण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणून सरसंघचालक भागवतांनी तूर्तास निवृत्तीचा विषय दोन्ही बाजूनी संपवला आहे, पण…

भागवत आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांना मोदी का डोईजड झाले आहेत, याची बरीच कारणे आहेत. पण त्याचा सारांश असा आहे की, ते भयंकर उपयुक्त वगैरे असले तरी संघाच्या अंकुशाच्या बाहेर गेले आहेत. खालच्या स्तरावर संघाच्या स्वयंसेवकांना एकीकडे मोदीच नेते हवे असले, तरी दुसरीकडे ते खरंच निवृत्त झाले तर महान योगी, त्यागी, तत्त्वनिष्ठ अशी त्यांची पूजा करायलाही तितकेच आवडेल. संघातील ही भावना मोदींपर्यंत नक्कीच पोचली असली पाहिजे.......